covid 19 – BelgaumRound.in https://www.BelgaumRound.in News, Jobs, Business, and more Thu, 29 May 2025 09:42:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0 https://i0.wp.com/www.BelgaumRound.in/wp-content/uploads/2025/03/cropped-Capture2.jpg?fit=32%2C32&ssl=1 covid 19 – BelgaumRound.in https://www.BelgaumRound.in 32 32 243165201 बेळगावमध्ये कोरोनाचा पहिला बळी : बेनकनहल्लीतील ७० वर्षीय वृद्धाचे दुर्दैवी निधन https://www.BelgaumRound.in/belgaum-reports-first-covid-19-death-of-2025/ https://www.BelgaumRound.in/belgaum-reports-first-covid-19-death-of-2025/#respond Thu, 29 May 2025 09:26:02 +0000 https://www.belgaumRound.in/?p=468 बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावातील ७० वर्षीय वृद्ध पुरुषाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले असून, त्यांना उपचारासाठी बिम्स (BIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार यशस्वी न ठरल्यामुळे त्यांनी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला.

ही घटना बेळगाव जिल्ह्यातील कोविड-१९ संसर्गामुळे झालेला पहिला मृत्यू ठरली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

राज्यात कोरोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोविडने पूर्वी कधीही न पाहिलेल्या वेगाने लोकांचे बळी घेतले आहेत. बेळगावातील कुंदनगरी भागातही कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.


बेळगाव तालुक्यात वाढती चिंता: ३ नवे रुग्ण

फक्त बेळगाव तालुक्यातच नवीन ३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या गावात रुग्ण सापडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी येळ्ळूर आणि निलजी येथे आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले होते. आता बेनकनहळ्ळी गावातही रुग्ण आढळल्यामुळे तिथेही सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. आरोग्य खात्याचे कर्मचारी सतत काम करत असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यांच्यावर ताण आला आहे.


नियम पाळा, स्वतःची काळजी घ्या

राज्य सरकारने कोविडसंबंधी नियमावली जाहीर केली असून, नागरिकांनी याचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
कोरोना विषाणू जितका धोकादायक नाही, तितकीच खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

corona update belgaum – Belgaum reports first Covid-19 death of 2025

]]>
https://www.BelgaumRound.in/belgaum-reports-first-covid-19-death-of-2025/feed/ 0 468
बेळगावात गर्भवती महिलेला कोरोनाची लागण: Corona Update Belgaum https://www.BelgaumRound.in/corona-update-belgaum-20250524/ https://www.BelgaumRound.in/corona-update-belgaum-20250524/#respond Sat, 24 May 2025 15:37:15 +0000 https://www.belgaumRound.in/?p=418 Corona Update Belgaum

कोविड-19 संसर्ग देशभरात वाढत असल्याचे संकेत; बेळगावमध्ये गर्भवती महिला पॉझिटिव्ह

संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला आहे. नुकतीच बेंगळुरूमध्ये एका ९ महिन्यांच्या बाळाला कोविड-19 संसर्ग झाल्याची अधिकृत पुष्टी झाल्यानंतर, सदर विषाणूने बेळगाव जिल्ह्यातही आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.

बेळगाव येथील एका २७ वर्षीय गर्भवती महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, तिला तत्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही महिला गेल्या महिन्यात पुणे, महाराष्ट्र येथे प्रवास करून आली होती. सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, तेथे एकूण ५० सक्रिय रुग्ण आढळले आहेत आणि आतापर्यंत या संसर्गामुळे ३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

कर्नाटकमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, काल एका दिवसात १९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या ३५ सक्रिय कोविड-19 रुग्ण असून, यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील नव्याने सापडलेले रुग्णही समाविष्ट आहेत.

या संदर्भात बेळगाव जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. पी. गडाद यांनी पत्रकार परिषदेद्वारे अधिक माहिती दिली असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचे सांगितले आहे.

.

]]>
https://www.BelgaumRound.in/corona-update-belgaum-20250524/feed/ 0 418