gudhi padwa – BelgaumRound.in https://www.BelgaumRound.in News, Jobs, Business, and more Wed, 02 Apr 2025 06:23:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0 https://i0.wp.com/www.BelgaumRound.in/wp-content/uploads/2025/03/cropped-Capture2.jpg?fit=32%2C32&ssl=1 gudhi padwa – BelgaumRound.in https://www.BelgaumRound.in 32 32 243165201 बेळगांव शहर व उपनगरात गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला https://www.BelgaumRound.in/gudhi-padwa-celebrated-with-enthusiasm-in-belgaum/ https://www.BelgaumRound.in/gudhi-padwa-celebrated-with-enthusiasm-in-belgaum/#respond Mon, 31 Mar 2025 17:48:10 +0000 http://www.belgaumround.in/?p=53 गुढीपाडवा  हा आनंद आणि परंपरा जपणारा सोहळा!

Gudhi Padava

बेळगांव शहर व उपनगरात गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कांही ठिकाणी तर नवीन कामाच्या उदघाटन  प्रसंगी उपस्थिथतांना पारंपरिक पेय आंब्याचे पन आणि कोशिंबीर देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा शुभ दिवस असलेल्या गुढीपाडव्याला ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्याची समृद्ध परंपरा आहे. ग्रामदैवतांच्या मंदिरांना विशेष विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थान पंचकमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने या सणासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात झाली, त्यानंतर भजन आणि मित्रमंडळांच्या विशेष कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

गुढीपाडवा उत्साहात! सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव, खरेदीला उधाण

गुढीपाडव्याच्या सणानिमित्त नागरिक सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर—जसे की व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर मेसेजिंग अॅप्सद्वारे—एकमेकांना आनंदाने शुभेच्छा देताना दिसले.

या शुभमुहूर्तावर ग्रामीण भागातील नागरिक शहरांमध्ये जाऊन विविध वस्तूंची खरेदी करताना पाहायला मिळाले. विशेषतः सोनं-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. याशिवाय, दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, टेम्पो यांसारखी वाहने खरेदी करत काही शेतकऱ्यांनीही या दिवसाचा लाभ घेतला. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी देखील मोठी मागणी पाहायला मिळाली.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पिरनवाडी, मच्छे, बेळगुंदी, हलगा आणि बस्तवाडसारख्या भागांतील लहान-मोठ्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सणासोबतच खरेदीचा आनंद घेत नागरिकांनी बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

]]>
https://www.BelgaumRound.in/gudhi-padwa-celebrated-with-enthusiasm-in-belgaum/feed/ 0 53