बेळगाव-मिरज एक्स्प्रेसला पुन्हा मुदतवाढ – प्रवाशांमध्ये समाधान
नैऋत्य रेल्वेने बेळगाव-मिरज एक्स्प्रेसला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या गाडीची सेवा 31 जुलै 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
ही एक्स्प्रेस जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली होती. पूर्वी ही गाडी पुश-पूल एक्स्प्रेस या नावाने धावत होती, मात्र काही कारणांमुळे तिचे संचालन थांबवण्यात आले होते. पूरस्थितीमुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली, परंतु अद्याप ती कायमस्वरूपी करण्यात आलेली नाही.
दर दोन महिन्यांनी या गाडीला मुदतवाढ देण्यात येत आहे. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद पाहता, ही एक्स्प्रेस कायमस्वरूपी सुरू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
बेळगावहून मिरजकडे जाणारी गाडी क्र. 07301
मिरज ते बेळगावी गाडी क्र. 07302










Leave a Reply