BelgaumRound.in

News, Jobs, Business, and more

विवेकानंद मल्टिपर्पज सौहार्द सहकारी संस्थेच्या नव्या संकेतस्थळाचे अनावरण

vivekanand society belgaum

विवेकानंद मल्टिपर्पज सौहार्द सहकारी संस्थेच्या नव्या संकेतस्थळाचे अनावरण

🚀 संकेतस्थळावर भेट द्या आणि अधिक माहिती मिळवा: https://www.VivekanandSouhardh.com

आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा बनला आहे. विवेकानंद मल्टिपर्पज सौहार्द सहकारी संस्थेने संकेतस्थळ सुरू करून या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन काकडे फाउंडेशनचे किशोर काकडे यांनी केले.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कॉलेज रोडवरील संस्थेच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. हा सोहळा संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. दत्तात्रेय नाडगौडा यांच्या हस्ते पार पडला. नव्या संकेतस्थळामुळे संस्थेच्या उपक्रमांची माहिती सहज उपलब्ध होणार असून, भविष्यातील योजनांबाबत अधिक पारदर्शकता येईल.

या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष कुमार पाटील, संचालक प्रशांत पाटील, पूजा पाटील, राहुल अंगडी , अनंता शेठ, अमर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

संकेतस्थळाविषयी संक्षिप्त माहिती सचिव पद्मा बाडकर यांनी दिली, तर तांत्रिक बाबींचे स्पष्टीकरण राहुल अंगडी यांनी केले. तसेच कृष्णा शहापूरकर आणि अनिरुद्ध हुन्नरगीकर यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा बाडकर, स्वागत अर्चना दरवंदर यांनी केले, तर आभार स्नेहल कुलकर्णी यांनी मानले. या सोहळ्याला सुहास गुर्जर, नितीन कपिलेश्वरकर, तृप्ती देसाई, योगेश अंगडी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *