८ तारखेला बेळगावच्या बेरोजगार युवकांनी कन्नड साहित्य भवनपासून डीसी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून निवेदन दिले. कर्नाटक सरकारच्या विविध विभागांमध्ये सध्या २.८६ लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. मागच्या पाच-सहा वर्षांत कोणताही भरतीप्रक्रिया झालेली नसल्यामुळे अनेक तरुण वयोमर्यादाही ओलांडून आजही नोकरीसाठी वाट पाहत आहेत.
या संघर्षाच्या माध्यमातून युवकांनी सरकारकडे आपली मागणी ठेवली आहे: भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, सर्व रिक्त पदे २०२५ पर्यंत भरली जावीत, किमान वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता द्यावी, थांबवलेल्या सर्व भरती प्रक्रिया त्वरित सुरू कराव्यात आणि केपीएससीमधील भ्रष्टाचार थांबवावा.
नौकरीच्या शोधात असलेल्या युवकांचा सरकारने विचार करावा, अशी या मोर्चातून मागणी करण्यात आली.










Leave a Reply