खानापूर-बेळगाव रस्त्यावर पिरनवाडी येथील संगोळ्ळी रायण्णा चौकाजवळ धावत्या कारच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी दि 1 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता घडली.
कार खानापूरहून बेळगावकडे येत असताना मच्छेजवळ तिच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. काही मीटर पुढे गेल्यानंतर कारने पेट घेतला. कारमध्ये चार ते पाच तरुण होते, परंतु प्रसंगावधान राखत त्यांनी त्वरित गाडी थांबवून बाहेर पडले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, कारच्या इंजिनजवळील भागाशिवाय इतर कोणताही मोठा नुकसान झाला नाही.
ही घटना वाहन देखभालीचे महत्त्व अधोरेखित करते. वाहनधारकांनी नियमित तपासणी करून सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे.










Leave a Reply