६ ऑक्टोबर २०२५ पासून बेळगावहून दिल्लीसाठी दररोज विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे.
यापूर्वी ही सेवा आठवड्यातून तीन दिवस होती, पण आता ती दररोज मिळणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फक्त अडीच तासांत बेळगाव ते दिल्लीचा विमानप्रवास सहज करता येईल. लष्करी तळ, औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण संस्था असल्यामुळे दररोज अनेक प्रवासी या मार्गावर ये-जा करतात.
दिवाळी, दसरा या सणांमुळे प्रवाशांची संख्या वाढली असून 90-95% सीट्स भरतात. सेवा दररोज सुरू झाल्यामुळे आता प्रवाशांचे त्रास कमी होणार आहेत, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.










Leave a Reply