पावसाळा सुरू होताच खेकड्यांची मागणी वाढते; बाजारात जोरदार विक्री
मान्सूनची चाहूल लागताच खेकड्यांच्या विक्रीला वेग येतो. बेळगाव शहरातील कॅम्प आणि खासबाग परिसर हे खेकड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. हिडकल जलाशय परिसरातून आणले जाणारे ताजे खेकडे दररोज सकाळी आठ वाजल्यापासून बाजारात दाखल होतात, विशेषतः हिडकल येथील महिलांकडून.
या खेकड्यांना आकारानुसार जोडीला सुमारे ₹50 ते ₹80 दर आकारला जात आहे. दर जरा अधिक असले तरीही ताज्या खेकड्यांची चव घेण्यासाठी खवय्ये उत्सुक आहेत. त्यामुळे ग्राहकांची उपस्थितीही वाढत आहे.
ग्रामीण भागांतील तलाव, ओहोळ आणि नद्यांमध्ये भर पावसात मिळणारे खेकडे अधिक चविष्ट मानले जातात. त्यामुळे रात्रीच्या वेळी तरुण मंडळी खेकडे पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसतात. कॅम्प येथील फिश मार्केटजवळील रस्त्यावर या खेकड्यांची थेट विक्री केली जाते.
सध्या शहरातील अनेक हॉटेल्समध्ये “खेकडा थाळी” लोकप्रिय ठरत असून त्यामुळे हॉटेल व्यवसायातूनही खेकड्यांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. गोव्याहून वर्षभरासाठी क्लस्टर केलेले खेकडे बाजारात उपलब्ध असले तरी पावसाळ्यात मिळणाऱ्या स्थानिक खेकड्यांना खवय्यांकडून विशेष पसंती मिळते.










Leave a Reply