BelgaumRound.in

News, Jobs, Business, and more

बेळगाव बाजारपेठेत अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र: Encroachment removal at Belgaum Market

Encroachment removal at Belgaum Market

Encroachment removal at Belgaum Market

बेळगाव : बाजारपेठेत अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र, व्यापाऱ्यांना वारंवार सूचना करूनही सुधारणा नाही

शहरातील प्रमुख बाजारपेठेत शिस्त निर्माण करण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. याबाबत व्यापाऱ्यांना वारंवार सूचना करण्यात येत असल्या तरीही, काहींच्या निष्काळजीपणामुळे ही कारवाई सातत्याने करावी लागत आहे.

गुरुवारी पुन्हा एकदा पांगुळ गल्ली परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आणि रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या.

गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, रविवार पेठ आणि कांदा मार्केट या प्रमुख व्यापारी भागांत सतत मोहीम राबवली जात आहे. अधिकारी पोहोचेपर्यंत काही व्यापारी आपले साहित्य हटवतात, मात्र नंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होते. यामुळे प्रशासन आता अधिक आक्रमक धोरण अवलंबत आहे.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पांढऱ्या पट्ट्याबाहेर व रस्त्याच्या कडेला थांबून व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील. यामध्ये फळ विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सध्या बाजारपेठेत काही प्रमाणात मोकळेपणा जाणवत आहे. प्रशासनाने सूचित केले आहे की, अतिक्रमणविरोधी मोहीम सातत्याने सुरूच राहणार आहे, जेणेकरून नागरिकांना सुसज्ज आणि सुरक्षित खरेदीचा अनुभव मिळेल.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *