Geet Ramayan programme by Marathi Bhasha Premi Mandal on 25 May 2025
मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव – शतक महोत्सव समितीची स्थापना; वर्षभर उपक्रमांची आखणी
बृहन्महाराष्ट्र मंडळ (नवी दिल्ली) अंतर्गत मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव शतक महोत्सवी कार्यकारी समितीची औपचारिक स्थापना करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी सुहास गुर्जर यांची निवड करण्यात आली आहे.
इतर प्रमुख पदांवर खालील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत:
-
कार्याध्यक्ष: नितीन कपिलेश्वरकर
-
उपाध्यक्ष: संकेत कुलकर्णी
-
सचिव: कुमार पाटील
-
खजिनदार: विलास पेडणेकर
-
मार्गदर्शक: प्रा. अनिल चौधरी व परशराम माळी
शतक महोत्सवी वर्षानिमित्त डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत मराठी भाषा प्रेमी मंडळामार्फत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध संस्था व नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
नियोजित उपक्रम:
-
गीत रामायण सादरीकरण – रविवार, २५ मे २०२५ रोजी, आर्ष विद्या केंद्र, टिळकवाडी येथे.
-
स्नेहालय स्पर्श शाळा, खासबाग – या संस्थेस आर्थिक सहाय्य प्रदान.
-
मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव – पदाधिकारी व जवानांना रक्षाबंधन साजरा करून सन्मानित करण्याचे आयोजन.
-
डॉ. किरण पुरंदरे (निसर्ग अभ्यासक) – शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निसर्ग विषयक व्याख्याने, चलचित्रे व छायाचित्र सादरीकरणाद्वारे.
या उपक्रमांमुळे मराठी संस्कृतीचा प्रचार, भाषेचे संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव वृद्धिंगत होईल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.












Leave a Reply