परवाना शुल्क आणि मद्याच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीच्या निषेधार्थ, कर्नाटक राज्यातील सर्व वाईन स्टोअर्स आणि बार २९ मे पासून बंद ठेवण्याचा निर्णय मद्य विक्रेता संघटनेने घेतला आहे. हा निर्णय राज्य सरकारच्या धोरणांविरोधात निषेध म्हणून घेण्यात आला आहे.
सध्या राज्यात मद्यविक्रीत घट झालेली असताना, परवाना शुल्कात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.
-
बारसाठी परवाना शुल्क ८ लाखांवरून थेट १५ लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
-
तर वाईन शॉप्सना आता २ लाखांऐवजी तब्बल १७ लाखांपर्यंतचा कर भरावा लागत आहे.
या वाढीमुळे छोटे आणि मध्यम व्यवसायधारकांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे व्यवसाय थांबवण्याशिवाय पर्याय नसल्याची भावना विक्रेत्यांमध्ये आहे.










Leave a Reply