BelgaumRound.in

News, Jobs, Business, and more

कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला: Low pressure in Arabian Sea

Low pressure in Arabian Sea

Low pressure in Arabian Sea – Heavy rain alert

कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कर्नाटक राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने कर्नाटकातील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर ४ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेले जिल्हे:

  • उत्तरा कन्नड

  • दक्षिण कन्नड

  • उडुपी

  • शिमोगा

  • चिक्कमगळूर

  • कोडगू

या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे (मे २७ पर्यंत):

  • बेळगाव

  • हसन

  • धारवाड

  • चामराजनगर

हवामान खात्याच्या सूचनांनुसार स्थानिक प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित स्थळी राहावे आणि अधिकृत सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *